Pimpri Chinchwad Election : पिंपरीत भाजप 125 जागा जिंकणार, अजित पवार गटाला फक्त 3 जागा – आमदाराचा मोठा दावा.

Dec 27, 2025 - 14:41
 0  1
Pimpri Chinchwad Election : पिंपरीत भाजप 125 जागा जिंकणार, अजित पवार गटाला फक्त 3 जागा – आमदाराचा मोठा दावा.

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड  महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका आमदाराने मोठा दावा केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण 128 जागांपैकी भाजप तब्बल 125 जागा जिंकणार, तर अजित पवार गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागेल, असा दावा करण्यात आला आहे.

              भाजप आमदाराने सांगितले की, राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशानंतर पक्षाची ताकद प्रचंड वाढली आहे.कलाटे यांच्या प्रवेशामुळे पिंपरीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असल्याचा दावा त्यांनी केला.आमदारांच्या मते, पिंपरी-चिंचवडमधील आगामी निवडणूक एकतर्फी होणार असून भाजप स्पष्ट बहुमताने सत्ता मिळवेल.स्थानिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भाजपसोबत असल्याचेही त्यांनी  सांगितले.

             त्याचबरोबर विकासकामे, पायाभूत सुविधा आणि भाजप सरकारच्या योजनांमुळे नागरिकांचा भाजपवर विश्वास वाढल्याचा दावा करण्यात आला.विरोधकांकडे ठोस नेतृत्व आणि संघटन नसल्यामुळे त्यांना मोठा फटका बसणार असल्याचे आमदारांनी म्हटले आहे. या दाव्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात खळबळ उडाली असून, अजित पवार गटाकडून या दाव्याला काय प्रत्युत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow