PCMC निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग..

Dec 23, 2025 - 09:47
 0  2510
PCMC निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग..

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे पुणे महानगरपालिकेसाठी अजित पवार गट आणि काँग्रेस यांच्यात युतीच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आक्रमक भूमिकेत दिसून येत आहे.

             आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असून, विविध पक्षांतील नेते आणि माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान दिले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ताकद वाढत असून, जनतेच्या विकासकामांवर आधारित राजकारण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

              भाजपकडे विकासाचा ठोस अजेंडा असून, शहरातील नागरिक भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, अजित पवार गटासाठी ही स्थिती चिंताजनक मानली जात असून, महापालिका निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वाढती भाजपची ताकद आणि इनकमिंगमुळे राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow